Mangalashtake (मंगलाष्टके) – Govind Ganesh Abhyankar

अमितच्या जीवनीं सुहास्य उमले चैत्रालीच्या रूपें ।
देण्या आशिष या नव्या वधूवरां देवीस मी प्रार्थिले ।।
होतो आज सुरेख संगम इथें दोन्हीं कुलां जोडले । 
देई आशिष या विवाह सुदिनी देवी महन्मंगले ।।१।।
यावें श्री विघ्नेशा योगेश्वरीं सवें आशिष वर्षावया  ।
स्नेहीं सज्जन आप्त मित्र देती आशिष या वधूवरां ।।
ननववर्षातील आज शुभदिनीं सौभाग्य येतें गृहा । 
नांदा सौख्यभरें गृहीं उभयतां ईशास तुम्ही स्मरा ।।२।।
मृगशीर्षांतील आज द्वादशी तिथी आहे महन्मंगल ।
आनंदे जमले स्नेहीं  सोयरे देती शुभाशीर्वच ।।
नांदा सौख्यभरें सवें उभयतां सौख्यें भरा हे घर ।
लाभों सर्व सुखें जगिं अमितला विवाह हो सौख्यद ।।३।।
आयुष्यांत सदा सत्व परीक्षा पदों पदीं होतसे ।
धैर्यानें सहजीवनीं तुम्हीं सदा सन्मार्गी चाला पुढें ।।
आहे पाठीशी ईश नित्य तुमच्या गांठा यशोमंदीरा ।
देती आशिलाभो ष श्री महागणपती , योगेश्वरीं मंगला ।।४।।
हर्षाचा दिन आज हा उगवला अमितच्या जीवनीं । 
आले देवही पुण्य वर्षूनी जगिं सौभाग्य हे घेऊनी ।।
देती आशिष आप्त सर्व जमुनी मंगलाक्षता वर्षूनी ।
होवो सौख्यद हा विवाह अशी ही देवा तुला मागणी ।।५।।
वंदोनी अंबिके भगवती शुभकार्य आरंभिले ।
देण्यां आशिष या नव्या वधूवरां गजानना  प्रार्थिले ।।
कोरोना सरू दे , आरोग्य लाभूं दे व्हावे शुभ-मंगल ।
देउनी सहकार्य एकमेकां साधा यशोमंगल ।।६।।
जे जें मंगल सौम्य सुंदर जगिंलाभो तुम्हां वेगळें ।
सौख्याचा सहवास नित्य घडूं दे आनंद नीत वर्षू दे ।।
घरासाठीं झिजा सुखें सहचरा, सुयश त्वां लाभूं दे ।
सर्वांना सुखवीत जीवन जगा , सौख्य तुम्हां लाभूं दे ।।७।।
आतां जीवन संगरांत जगतीं टाका तुम्हीं पाऊलें ।
जे जे उत्तम सौख्यदायक जगिं लाभो सदा चांगले ।।
शृंगारांत जगिं आनंद उमले क्षणाची पत्नी मिळे ।
लाभों सर्व सुखें सदा श्रमत जा निरोगी व्हा चांगलें ।।८।।
वधू-वर्यो शुभम भवतु सावधान।।
 नांदा सौख्यभरे ।।

Note: Feel free to copy, change and use the above content. It would be nice if you leave a comment on doing so.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top